Wednesday, October 09, 2024

जाणीव

वाटले सगळे, मज उमजले होते, 
ते पहाड मोठे, मी सर केले होते.
संपले होते तेव्हा, हे झुंजणे माझे,
शांततेत मी छान, पार रमले होते.

आज जाणले मी, मी हरवले आहे, 
माझ्यातली ती मी, कुठे सोडली आहे. 
खूपदा ती मी मला, आठवून दाटते, 
पायथ्याशी ती मला, खुणावून हासते. 

-    By AlpsAlive