Friday, July 06, 2012

चौकोन षट्कोन

[© Copyright 2012, All Rights of/for this poem reserved by author of this blog]

तोड ते मनातले, गोल गोल  रिंगणे,
काम रे तयांचे, पुन्हा पुन्हाच गुंतणे.
सोड तू त्या चौकटी, तयातले ते आकडे,
तेच न्हेत रे तुला, पुन्हा पुन्हाच वाकडे.


काय त्यात मांडले, अन काय कुणी वाचले,
कुणा कळे किती खरे, किती कुणाचे वाचविले.
कोण आखतो रे ती, कुणा कडे ती योग्यता,
कुणी दिलेत त्यान कडे, नको नको ती यंत्रणे.


बघ तू जरा पुढे, कधी वर डोकाऊनं रे,
पळून लाव आकडे, मनातुनं तू त्यातले,
ऐक काय सांगते, तुला तुझे हृदय रे,
बजाव ते मानस तू, कि तेच "त्याने" योजिले. 


योग काल साधुनी, वेळ ती येईल ही,
वाट पाहुनी किती, निघून ही जाइल ती.
तुझ्याच जे हातात रे, निसटून नको जाऊदे,
तुलाच ते करायचे, विसरून नको जाऊ रे. 


- अल्पना अ साटम

2 comments:

  1. mastach Alpana ... apratim....liked it ...
    "तोड ते मनातले, गोल गोल रिंगणे,
    काम रे तयांचे, पुन्हा पुन्हाच गुंतणे."
    .. khupach chhan !!!

    ReplyDelete