Sunday, November 17, 2013

Tripuri Poornima

आज त्रिपुरी पूर्णिमा.
हे मला संध्याकाळ पर्यंत माहित न्हवत. संध्याकाळी बाहेर बसलेलो तेव्हा छाया काकी वाती बनवत होत्या. तब्बल ७५० वाती. आज म्हणे ७५० वाती चे दिवे लावतात. मला माहित न्हव्ते. आम्ही कधीच लावल्या नहित. आणि छाया काकी हे हि म्हणाल्या कि आज स्त्रियांनी कार्तिक देवाचे दर्शन घ्यावे. वर्ष भरात आजचा एकाच दिवस असतो, कि स्त्रीयांना कार्तिक देवाच्या देवळात जाऊन दर्शन घेणे allowed असते. का ते माहित नाही.

त्रिपुरी पूर्णिमा वरून मला आमच्या office मधला जयेश आठवला. तोः एकदा म्हणाला होता कि त्यांच्या घरी कंदील त्रिपुरी पूर्णिमे पर्यंत लावतात. आणि आज कलाले कि सगळ्यान कडेच कंदील आज च्या दिवसा पर्यंत लावतात :)

थोडे google केल्या वर कळले की -

१) आज शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षस चा वध केला होता. का ? कारण -
it seems - त्रिपुरासुराने शंकराची तपस्या करून आशीर्वाद घेतला आणि तीन शहर बांधली सोना चांदी आणि लोखंड ची. त्रिपुरासुर खूप शक्तिशाली झाली आणि सगळ्या मानव जाती ला आणि देवांना त्रास देऊ लागला, मारू लागला. म्हणून ब्रम्हा आणि विष्णु ने शंकरा कडेच धाव घेतली. तेव्हा शंकराने तीन दिवस लढाई करून त्रीपुरासुराला मारले. तोः म्हणजे आजचा दिवस - कार्तिक महिन्यातल्या पूर्णिमेचा :)

२) म्हणून काही भागात आज देव दिवाळी असे हि म्हणतात.

३) आज तुळशी लग्नाचा शेवटचा दिवस

४) आणि कार्तिक महिन्या चा आज शेवटचा दिवस. म्हणून आज कार्तिक पूर्णिमा असा हि म्हणतात

संध्याकाळी छाया काकींनी दिवे लावले तेव्हाचे फोटो मी कद्ले. मस्त आले आहेत.



 




No comments:

Post a Comment