हरवशील का माझ्यात पुन्हा
वेङ लागल्या सारखे
ध्यास घेतल्या सारखे
वाट चुकलेल्या सारखे
डोळ्यात माझ्या उतरूनी तू
भान माझे हरपवावे
विसर पाङूनी जगाचा
मी स्वताःला हरंववावे
रुप माझे, शब्द माझे तेच तरी ही.
नवे तुला भासतील का...
पुन्हा नव्याने, जुन्या सारखे
माझ्यात माझ्या गुंतशिल का.
मला पाहता तुझे बोलणे
एका एकी थांबेल का.
ते बारकावे नीट निर्खावे
से पुन्हा तुला वाटेल का.
कोशातले शब्द सारे
साथ तुझी देतील का.
साठलेले आत सारे
व्यक्त होउ देशिल का.
पुन्हा नव्याने, जुन्या सारखे
माझ्यात माझ्या हरवशील का.
- AlpsAlive
No comments:
Post a Comment