Wednesday, June 29, 2011

दिशाहीन


[© Copyright 2011, All Rights for this poem reserved by author of this blog]

फोटो - राहुल मुळे

आज काल कुणा कळे,
ही पाउले पड़े कुठे.
पोहोचले हे मी इथे,
पण जायाचे मला कुठे ?

जाऊनी तो ढ़ग वारा,
घुमुनिया परतला.
मला पाहुनी तिथेच,
गरजुनी बरसला.

दूर झाली धूळ माती,
दूर  पान पाचोळा.
पण तरी ही वाट माझी,
दूर दूर वर दिसेना.

वाट ही कधी कुठे,
कुणा कड़े गमावली?
एकटी मी पास माझ्या,
फ़क्त माझी सावली.

गाढ गाढ गोंधळात,
शोधते मी ती छबी.
जायचे मला कुठे नी,  
 मी तरी इथे उभी.

वाट काडूया तयात,
मी मलाच सांगते.
पाऊले न देत साथ,
अन मी तिथेच थांबते.

काय रोखते मला,
कोणती ही हथकडी?
बांधते मला इथे,
कोणती ही साखळी?

तोडूनी कवच हे सारे,
बाहेर आहे पडायचे.
घ्यायचा हा ध्यास आता,
नाही दिशाहीन व्हायचे!!!

6 comments:

  1. aray wah... pochlas hya page...
    1st one to read this page..
    thanks...

    ReplyDelete
  2. Khup chan...ekdum chuuu gayi kavita tuzi...

    ReplyDelete
  3. boss... this is NOT copy past. Its MY BLOG and its MY kavita :)

    ReplyDelete
  4. OMG ... dont tell.. tht was really sweet shock for me... keep it up.. will love to see some more from you ..

    ReplyDelete