Wednesday, July 18, 2012

क्षितिजा वरचे सारे

[© Copyright 2012, All Rights of/for this poem reserved by author of this blog]


असे वाटले कि, सापडले तारे,
हरवलेले कोणे काळी, हाती आली सारे.

असे भासले कि, आले मी आता रे,
तिथे जेथे बंद होती कायम आधी दारे.

असे काही सुटलेले चैतन्या चे वारे,
जणू काही संपलेच, काळोखाचे झारे.

जरा बसते, मनी जपते,तर गायबच झाले,
पुन्हा बघते, तर कळते, ते तर क्षितिजा वरचे सारे...  :-(

- अल्पना अ साटम

1 comment: