Saturday, December 28, 2013

जग जुने

नाणे ऩॉटांच्या पुढे,
वसते एक जग जुने.
दिसले ते ज्यास जीथे,
मार्ग जगण्याचा सापडे.

नसे ते सोपे जरी,
अशक्य मुळीच न्हवे.
कस लागते जराशी,
बस वाट शोधण्यास रे.

श्वास विश्वासांचे,
तिथे हात आधारांचे.
जिथे ऩाहीसे होतील,
अंतर मना मनांचे.

नाणे ऩॉटांच्या पुढे,
वसते एक जग जुने.
दिसले ते ज्यास जीथे,
मार्ग जगण्याचा सापडे.

- By Alpana A Satam

No comments:

Post a Comment