कोण येते इथे हे वाचण्यास गं,
कुणाला पडले आहे काय आतल्यात गं .
आहे काळजी त्यांना नक्कीच गं ,
पण आतले काय ते कळायला ते आटतात गं .
जाऊदे जाऊदे सोडून दे गं ,
त्यांना ते कळावे ही कशाला आस गं ?
ज्यांना कळायचे ते गेले दूर गं ,
मग आता कशाला ही हुरहूर गं ?
खोल ती विहीर दे पुन्हा भरून गं ,
त्यात तू पुन्हा दे झोकून गं.
दाट ढगातून पण प्रकाश पडेल गं ,
त्याच त्या मनाचे पोवळे पुन्हा फुलेल गं .
- AlpsAlive